
विश्रांती एका अस्वस्थ जगात
सारांश
ताणतणाव आणि जास्त कामामुळे अनेकांना त्यांच्या कबरेत वेळेपूर्वीच आणले जाते. पण निर्मितीच्या वेळी, देवाने तणावाच्या समस्येवर एक उपाय तयार केला: विश्रांतीचा दिवस. या पवित्र दिवसाची रचना आशीर्वाद म्हणून करण्यात आली होती जेणेकरून मानव त्यांच्या कामातून विश्रांती घेऊ शकतील आणि देवासोबत वेळ घालवू शकतील. दुर्दैवाने, जरी देवाने लोकांना ते लक्षात ठेवण्याची आज्ञा दिली असली तरी, बहुतेकजण या विशेष दिवसाबद्दल विसरले आहेत आणि बरेच जण त्यांना तो देणार्या निर्माणकर्त्याला देखील विसरले आहेत.
प्रकार
पत्रिका
प्रकाशक
Sharing Hope Publications
21 भाषेमध्ये उपलब्ध
पृष्ठे
6
मीता दुरनचा मृत्यू झाला होता. दोलायमान, २४ वर्षीय इंडोनेशियन कॉपीरायटर तिच्या डेस्कवर कोसळली होती. काय झाले होते?
मीता एका जाहिरात एजन्सिसाठी काम करत होती, जिथे अपेक्षा जास्त होत्या आणि कामाचा ताण फार जास्त होता. तिच्या मृत्यूपूर्वी, तिने सोशल मीडियावर तिच्या थकन्याबद्दल टिप्पणी केली: “आज रात्री, मी थेट आठव्या दिवस ऑफिसच्या चाव्या जवळ घेऊन जात आहे…. मला माझे जीवन नाही.”
ती कॅफीनयुक्त पेय क्रेटिंग डेइंगवर खूप अवलंबून होते, रेड बुलची आशियाई आवृत्ती. तिची शेवटची ऑनलाइन टिप्पणी म्हणाली, “३० तास काम केले आहे आणि अजूनही मजबूत आहे.” त्यानंतर ती तिच्या डेस्कवर कोसळली आणि कधीच उठली नाही.
काय झाले? जास्त कामामुळे मीता मरण पावली.
आज आपल्यापैकी अनेकांच्या कामाचे वेळापत्रक फार व्यस्त असते. समाज आम्हाला आग्रह करतो अधिक काम करण्यासाठी, अधिक कमवण्यासाठी आणि अधिक खरेदी करण्यासाठी. आपण तणाव, निद्रानाश आणि मानसिक दबावाने ग्रस्त आहोत.
आपण मिता दुरन सारखे स्वत: ला मारत नसाल, परंतु जीवन एक भारी ओझे असू शकते. देवाने आपल्यासाठी हेच ठरवले होते का? तो शांती देणारा आहे. जेव्हा आम्ही स्वतः जास्त काम करतो, आम्हाला शांत वाटते का? कदापि नाही!
जर आपण पूर्णपणे थकलो आहोत, तर असे असेल की आपण काहीतरी विसरत आहोत जे आपण लक्षात ठेवावे अशी देवाची इच्छा आहे. त्याने विश्रांतीबद्दल काय म्हटले आहे ते आपण शोधूया.
“विराम” बटण दाबा
देव अत्यंत दयावान आणि अत्यंत मेहरबान आहे. सेल फोन किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरप्रमाणेच मानवाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा रिचार्ज करण्यासाठी वेळ लागतो हे त्याला माहीत होते. म्हणून, संदेष्टा मोशे (याला मुसा असेही म्हणतात) याने देवाची आज्ञा नोंदवली:
शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस तुम्ही श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेहि कामकाज करू नको (पवित्र शास्त्राच्या पहिल्या भागातून, ज्याला तवरात असेही म्हणतात: निर्गम २०:८-१०).
देवाचा हा न बदलणारा नियम आपल्याला सातव्या दिवसाची आठवण ठेवण्यास सांगते. जगातील अनेक भाषांनुसार, विश्रांतीसाठी समर्पित या सातव्या दिवसाला “शब्बाथ” म्हणतात. देवाने आपल्याला शब्बाथ दिवसाची आठवण ठेवण्याची आज्ञा का दिली? कारण त्याला माहीत आहे की विस्मरण ही मानवजातीसाठी आदामापासून सुरू असलेली सततची समस्या आहे. आपण देवाच्या आज्ञा विसरता कामा नये, कारण केवळ आपण त्याला आणि त्याच्या आज्ञांचे स्मरण ठेवू तर आपण सरळ मार्गावर चालत राहू.
पण शब्बाथ हा विशेष का आहे? देव आपल्याला सांगतो,
कारण सहा दिवसांत परमश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देूऊन पवित्र केला (निर्गम २०:११).
शब्बाथ एक महत्त्वाची आठवण आहे की देव हा निर्माणकर्ता आहे. काही लोकांचा असा आक्षेप आहे की देव थकत नसल्यामुळे, त्याला गरज नाहीविश्रांतीची सातव्या दिवशी. परमेश्वराने थकल्या मुळे विश्रांती घेतली नाही; त्यानी त्याची निर्मिती थांबवली याकरिता की तो आपल्याला विश्रांती करण्यासाठी पवित्र वेळ तयार करू शकेल.
देवाने पाहिले की विश्रांतीचा दिवस मानवजातीसाठी उत्तम आहे. त्याने सातव्या दिवसाला शब्बाथ बनवले, याचा अर्थ मध्यांतर किंवा विराम. अशा प्रकारे, प्रत्येक आठवड्याचा सातवा दिवस “विराम” बटण दाबण्यासाठी एक विशेष दिवस आहे. आपण कामापासून आणि पवित्र नसलेल्या उपक्रमापासून विसावा घेऊन एक संपूर्ण दिवस त्याचे स्मरण आणि भक्ति केली पाहिजे.
तुमच्या बॉसने किंवा तुमच्या प्राध्यापकाने तुम्हाला अधिक विश्रांती घेण्याची आज्ञा दिली तर ते अतिउत्तम नाही का? तरीही देवाने नेमकी हीच आज्ञा दिली आहे! देवाची स्तुति असो! तो खरोखर दयावान आहे!
परमेश्वराचा दिवस पवित्र राखणे
शब्बाथ हा जगातील सर्व लोकांसाठी एक वैश्विक पवित्र दिवस आहे. तो पाळला होता एकेश्वरवादी विश्वासणाऱ्यांनी जे एक खर्या निर्मात्या देवावर विश्वास ठेवणारे होते, यहुदी, ख्रिस्ती, मुस्लिम, बौद्ध किंवा हिंदू अस्तित्वात असण्याच्या खूप आधीपासून. खरेतर, जगाची निर्मिती झाली तेव्हा तो सर्व मानवजातीला देण्यात आला होते. आदाम आणि हव्वा (हवा म्हणूनही ओळखले जाते) यांनी शब्बाथ पाळला, आणि देवाने आम्हाला जे आठवणित ठेवण्यास सांगितले ते त्यानी विसरण्याची परवानगी कधीही दिली नाही.
दुर्दैवाने, शब्बाथ अनेकदा विसरला गेला आहे. संदेष्ट्यांनी प्राचीन यहुद्यांना चेतावणी दिली की जर ते शब्बाथ विसरले तर देव त्यांच्यावर नाश आणेल. त्यांनी चेतावणीकडे लक्ष दिले नाही, म्हणून येरूशलेमचा नाश झाला आणि त्यांच्या कुटुंबांना बंदिवासात नेण्यात आले. ख्रिस्ती लोकही शब्बाथ विसरून गेले त्यांचा पवित्र दिवस रवीवरमध्ये बदलून देवाच्या आज्ञाच्या विरोदात. मुस्लिम शुक्रवारी प्रार्थना करतात परंतु हे विसरले आहेत की आपल्याला सातव्या दिवशी विश्रांती घेणे आवश्यक आहे निर्मात्याच्या पूर्ण आज्ञाधारकपणे जगण्यासाठी.
असे का वाटते आपले सारे जग हा महत्त्वाचा दिवस विसरत चालले आहे? या व्यापक विस्मरणासाठी एक अधिक भयंकर कारण आहे का?
येशू मशीहा (ज्याला इसा अल-मसीह देखील म्हटले जाते) याने आपल्याला चेतावणी दिली आहे येणाऱ्या जगभरातल्या सामर्थ्याबद्दलची ज्याचा उपयोग सैतान (शैतान) आपले मन आपल्या निर्मात्यापासून दूर करण्यासाठी वापरेल. खोट्या शब्बाथ दिवशी उपासना करण्यास लाखो लोक फसवले जातील. जर सैतान आपल्याला निर्मात्याच्या दिवसाचा विसर पाडू शकतो, त्याला आशा आहे की आपण स्वतः निर्माणकर्त्याला विसरु. तथापि, जेव्हा आपण खरा शब्बाथ पाळतो, आपण आपल्या निर्मात्याप्रती आपली निष्ठा दाखवतो आणि आनंद घेतो विश्रांती, आराम, आणि शांती या देणगीचा.
देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश करणे
संदेष्टा मोशेने लिहिले की “प्रभूने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला” (उत्पत्ति २:३) . तुम्ही थकलेले भागलेले आहात का? शब्बाथमध्ये अनेक आशीर्वाद आहेत!
इंडोनेशियातील कॉपीरायटर मिता दुरन, जास्त काम केल्यामुळे मरण पावली—पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. देव तुम्हाला दर आठवडी आपल्या कामपासून विश्रांती घेण्यास आमंत्रित करत आहे, शब्बाथाच्या आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी.
जर देव आपल्याला विश्रांती, शांती आणि उपचार कसे देतो याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, तर कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.
Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.मराठी सुधारीत आवृत्ती (पुन्हा संपादित) बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५.
आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा
नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

तुमचे प्रेक्षक शोधा
वैशिष्ट्यीकृत प्रकाशने
© 2023 Sharing Hope Publications