स्वतः कसे विचार करावे

स्वतः कसे विचार करावे

सारांश

देवाच्या संदेष्ट्यांनी “बाबेल” या लाक्षणिक सांकेतिक नावाने वर्णन केलेल्या एका धोकादायक धार्मिक शक्तीचे भाकीत केले. भविष्यवाणीनुसार, ही शक्ती आपल्याला खोट्या उपासनेत सक्ति करण्याचा आणि मोहित करण्याचा प्रयत्न करेल. आपण सुरक्षितता शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत:साठी विचार करणे आणि देवाच्या प्रकट वचनाशी कठोर निष्ठा राखणे. हे पत्रक आपल्याला आपल्या मनाचा उपयोग कसा करावा हे सांगते जेणेकरून आपण जागतिक संकटाच्या वेळी शहाणे, विचारी विश्वासणारे होऊ.

प्रकार

पत्रिका

प्रकाशक

Sharing Hope Publications

21 भाषेमध्ये उपलब्ध

पृष्ठे

6

डाउनलोड करा

लांब चढाईनंतर आम्ही नुकतेच गुनुंग दाटुकच्या शिखरावर पोहोचलो होतो. दृश्याचा आनंद घेण्यासाठी मी माझा नवीन मित्र अ‍ॅडझाक सोबत बसलो. काही वेळातच आमचे संभाषण धार्मिक विषयांकडे वळले.

“मी एक मुक्त विचारवंत आहे,” अ‍ॅडझॅकने दावा केला. “जगाबद्दलची माझी स्वतःची मते आहेत.”

“अह होय,” मी उत्तर दिले. “मी अनेक मलेशियन तरुणांना स्वतः ला मुक्त विचारवंत म्हणून ओळखताना ऐकले आहे.”

अ‍ॅडझाक हसला. “आपण स्वतः विचार केला पाहिजे. अन्यथा खूप गोंधळ आहे. ते तुला वेडे करेल.”

“पण घरी गेल्यावर काय?” मी विचारले. “येथे मलेशियामध्ये अनेक तरुण स्वत: ला मुक्त विचारवंत म्हणतात, पण घरी तुम्ही इस्लामिक किंवा बौद्ध विधींमध्ये सहभागी व्हावे असे अपेक्षित असते. तुम्ही तुमच्या आईवडिलांना काय सांगता?”

“मी त्यांना सांगत नाही, ” अॅडझाकने उत्तर दिले. “मी फक्त त्यांना जे पाहिजे त्याबरोबर जातो. मी मोकळेपणाने विचार करू शकतो, पण मी ते माझ्यापुरतेच ठेवले पाहिजे.”

मुक्त विचार  करणे महत्वाचे आहे का?

जगाच्या काही भागांमध्ये, चुकीच्या विश्वासामुळे तुम्हाला तुमच्या समुदायातून बहिष्कृत केले जाऊ शकते, तुमच्या नोकरीवरून  काढून टाकले जाऊ शकते किंवा मारले जाऊ शकते. स्वतः विचार करणे धोकादायक ठरू शकते. पण काय ते महत्वाचे आहे? 

आपले जग चांगल्या आणि वाईट कल्पनांनी भरलेले आहे. वाईटातून चांगले बाहेर काढण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याबद्दल विचार करणे आणि बोलणे. तुम्ही सोने, केशर किंवा आयफोन सारखी महागडी वस्तू खरेदी केल्यास - तुम्ही फक्त त्यासाठी पैसे देऊन ते घरी घेऊन जाणार नाही. तुम्‍ही याची तपासणी कराल आणि तुम्‍हाला खरोखरच उत्‍तम गुणवत्‍ता मिळत आहे याची खात्री करण्‍यासाठी स्‍पर्धकांच्या उत्‍पादनांशी तुलना कराल. कल्पनांना ह्याच पद्धतीने वागवले पाहिजे. 

जगात खूप गोंधळ आहे आणि जेव्हा लोक त्यांच्या स्वतःच्या गोंधळलेल्या कल्पना समाजावर लादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते आणखी वाईट होते. मला तुम्हाला एका महत्त्वाच्या भविष्यवाणीबद्दल सांगू द्या. “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण” नावाच्या खूप जुन्या पुस्तकात एक भविष्यवाणी अशा लोकांबद्दल सांगते जे त्यांचे गोंधळलेले धार्मिक विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणते, “पडली, मोठी बाबेल पडली, तिनें आपल्या जारकर्माबद्दलचा  क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे” (प्रकटीकरण १४: ८) .

हे प्रतिकात्मक शब्द समजणे कठीण नाही. बाबेल हे एक प्रसिद्ध प्राचीन शहर होते, परंतु त्याच्या नावाचा अर्थ “गोंधळ” असे आहे. हे शहर “पडले” आहे ती गोंधळलेली आहे म्हणून नाही परंतु तिला तिचा गोंधळ मागे सोडायचा नाही म्हणून. ती राष्ट्रांना तिच्या आध्यात्मिक व्यभिचारात सामील होण्यासाठी मोहित करते—म्हणजे, खोट्या आणि खऱ्या उपासनेचे मिश्रण करून देवाचा विश्वासघात करणे. या खोट्या कल्पना सामान्य केल्या जातात आणि स्वीकारल्या जातात. “बाबेल” बद्दलची ही भविष्यवाणी जगभरातील आध्यात्मिक व्यक्तीचा संदर्भ देते जी केवळ आध्यात्मिक त्रुटी सामान्य करते असे नाही तर शेवटी सत्याला चिकटून राहणाऱ्या लोकांवर ती लादण्याचा प्रयत्न करते.

येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने असे भाकीत केले होते की हे आपल्या काळात घडेल. कदाचित तुम्ही हे आधीच घडताना पाहिले असेल. खोट्या कल्पनांनी देवाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत का? तुम्हाला तुमच्या सतसतविवेकबुद्धीने अस्वस्थ वाटले आहे का?

होय, म्हणूनच मुक्त विचार महत्त्वाचा आहे.

स्वतः कसे विचार करावे

बहुतेक लोक त्यांच्या समाजाच्या धर्माचे पालन करण्यात समाधानी असतात. ते त्यांच्या श्रद्धांच्या माध्यमातून विचार करत नाहीत. ते धार्मिक परंपरांचे पालन करतात ज्यांचा काहीही अर्थ नाही किंवा त्याने चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होते. कधी कधी, ज्या धर्मगुरूंनी आपल्याला देवाचा मार्ग दाखवायचा असतो, ते स्वतः नैतिक विकृतीने भरलेले असतात.

आपण कसे सत्य शोधू शकतो? मी सुचवितो की आपण संदेष्ट्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. का? तीन कारणे आहेत:

१. संदेष्टे भविष्याबद्दल आश्चर्यकारक ज्ञान दाखवतात. संदेष्टा दानियलने जगाच्या वसाहतीच्या ऐतिहासिक स्थानावर युरोपच्या उदयाची भविष्यवाणी केली. येशू ख्रिस्ताने (इसा अल-मसीह म्हणूनही ओळखले जाते) यरूशलेमच्या नाशाची भविष्यवाणी ७० सामान्य युग मध्ये केली होती. संदेष्टा मोशे (मुसा) यानी इश्माएलच्या इतिहासाची शेवटल्या कळापर्यंत भविष्यवाणी केली.

२. संदेष्टे आरोग्याचे आश्चर्यकारक वैज्ञानिक ज्ञान दाखवतात. सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी जगलेल्या संदेष्टा मोशेने वेगळे राहणे (विलग्नवास), सांडपाण्याची स्वच्छ विल्हेवाट आणि निर्जंतुकीकरणाची तत्त्वे स्पष्ट केली. त्याने प्राणी सृष्टीला शुद्द आणि अशुद्ध असे विभागले. आणि जेव्हा आपण स्वच्छ मांस खातो तेव्हा रक्त किंवा चरबी खाऊ नका असे त्याने आम्हाला सांगितले. आजही, जे लोक त्याच्या आहाराचे आणि स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करतात ते सामान्य लोकांपेक्षा १५ वर्षे जास्त जगतात.

३. देव त्याच्यावर आणि त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवणार्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देतो. 

संदेष्ट्यांचे लिखाण मार्गदर्शनाने भरलेले आहेत —परंतु त्यांचा फायदा होण्यासाठी, आपण गंभीरपणे विचार करायला शिकले पाहिजे, आपल्या विश्वासांची चाचणी केली पाहिजे आणि आपल्या विश्वासाचे पुरावे तपासन्यास शिकले पाहिजे. विचार करणे हा खऱ्या धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आता, जेव्हा आम्ही त्रुटीची चौकशी करतो तेव्हा काय होते? सुरुवातीला ते खरे वाटू शकते. पण जसजसे आपण पुरावे शोधतो तसतसे आपण पाहू लागतो विचारामध्ये समस्या. 

सत्य अगदी विरूद्ध आहे. ते कधीही काहीही गमावत नाही जेव्हा त्याची काळजीपूर्वक तपासणी होते. आपण जितकी अधिक तपासणी करू तितके अधिक सत्य आपल्याला दिसेते. 

विश्वास ठेवणाऱ्यांनी जगातील सर्वात शहाणे लोक असले पाहिजे कारण देव आपल्याला शहाणपणाच्या मार्गाने मार्गदर्शन करतो. जर तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत सापडता जिथे तुम्हाला मोकळेपणाने विचार करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची परवानगी नाही, तर ते देवाकडून नाही.  देव आपल्याला जवळून तपासणी करण्यास आमंत्रित करतो कारण सत्य हे मजबूत आहे तपासणीला सामोरे जाण्यास. परंतु बाबेल तुम्हाला खोटेपणात फसवन्यास मोहित करते आणि बौद्धिक प्रयत्नांची दारे बंद करून तुम्हाला तिथे ठेवते.

जर तुम्ही इतके गोंधळलेले असाल की तुम्हाला बाबेलमध्ये असल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही बाहेर या! देवाच्या सूज्ञानाच्या मार्गाकडे या. स्वतः विचार करा आणि अत्यंत काटेकोरी प्रश्न विचारा. तुम्ही निराश होणार नाही. 

तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का? कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती (पुन्हा संपादित) बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५.

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover