
दयेसाठी तळमळ
सारांश
देवाची दया कशी दिसते? तो फक्त म्हणतो का, “मी तुला क्षमा करतो,” किंवा आपली लज्जास्पद नोंद साफ करण्यासाठी तो पर्याय देतो? या पत्रिकेमध्ये एक स्वदेशी कथा सामायिक करण्यात आली आहे जेणेकरून पर्यायी बलिदानाची गरज आणि अर्थ स्पष्ट करण्यात मदत होईल. त्यांच्या पापाची क्षमा आणि त्यांची लाज दूर केली जाऊ शकते हे जाणून वाचकांना आशा मिळेल.
प्रकार
पत्रिका
प्रकाशक
Sharing Hope Publications
21 भाषेमध्ये उपलब्ध
पृष्ठे
6
ईद अल-अधासाठी फातिमा एकटीच होती, आणि तिचे एकटेपण तिला सहन करण्यापलीकडे वाटले. तिचा एकटेपणा हा तिचाच दोष होता, नाही का?
फातिमाला आठवले की तिने अहमदशी लग्न करण्यासाठी तिच्या वडिलाशी किती भयानकपणे वाद घातला होता. ती तरुण होती व प्रेमात होती. तिचे वडील नाही कसे म्हणू शकतील? अहमदशी लग्न करण्यासाठी जेव्हा ती पळून गेली तेव्हा तिचे वडील म्हणाले की तिने कधीही परत येऊ नये.
अहमदवरील प्रेमामुळे, तिला वाटले, ती लज्जा सहन करू शकेल. पण लवकरच, तिला कबूल करावे लागले की तिचे वडील बरोबर होते. अहमद तो माणूस नव्हता तिला वाटले ज्याच्या प्रेमात ती पडली. त्याने तिला एका दुसऱ्या स्त्रीसाठी सोडले.
फातिमाला स्वतःची लाज वाटली. तिला विश्वास होता की तिला न्याय मिळाला आहे आणि ती किंमत चुकवत आहे. तिला न्यायाची चांगली समज होती. पण अरे, तिचे मन दयेसाठी किती आतुर होते!
अत्यंत दयावान आणि अत्यंत मेहरबान
जर आपण प्रामाणिक आहोत, तर आपण सर्वांनी चुका केल्या आहेत आणि शहाणपणाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही इतरांना नाराज केले आहे. इतरांनी आम्हाला नाराज केले आहे. आमचा समुदाय चुका करणाऱ्या लोकांपासून बनलेला आहे. आणि किती कठीण आहे एकमेकांना आणि स्वतःला क्षमा करणे !
आमच्या चुकांसाठी दया आहे का?
“बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम”—“अत्यंत दयावान, अत्यंत मेहरबान देवाच्या नावाने” या साध्या वाक्याची तुम्ही किती वेळा पुनरावृत्ती केली आहे याचा विचार करा. दयेबद्दल इतके विशेष काय आहे?
कदाचित हे आहे कारण आपल्या समुदायांना-आणि आपल्या अंतःकरणाला-दयेची खूप गरज आहे.
दया: अधिक चांगला मार्ग
काही वर्षांपूर्वी अब्दुल-रहमान नावाच्या माणसाने त्याचा शेजारी करीमशी भांडण करून त्याला ठार मारले. या छोट्या मिसरदेशातील गावात दोन्ही कुटुंबांचे जीवन ठप्प झाले. करीमच्या कुटुंबाने बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर अब्दुल-रहमानच्या कुटुंबाने भीतीने त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. अब्दुल-रहमानला सूडाचे चक्र चालू ठेवायचे नव्हते. त्याने गावातील पुढाऱ्यांना सल्ल्यासाठी विचारले आणि त्यांनी मृत्यूच्या आच्छादनाच्या विधीची शिफारस केली.
अब्दुल-रहमानने स्वतःचे पांढरे दफन कफन आणले आणि त्याचावर चाकू ठेवला. तो चालत गेला करीमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी बाजारपेठेत, संपूर्ण गाव पाहत असताना. अब्दुल-रहमानने पीडितेचा भाऊ हबीबसमोर गुडघे टेकले आणि कफन आणि चाकू दिला. त्याने दया आणि सलोखा मागितला.
हबीबने अब्दुल-रहमानच्या मानेवर चाकू ठेवला. गावातील नेत्यांनी एक मेंढा आणला आणि हबीबला त्याचा निर्णय घ्यावा लागला: दया किंवा सूड? त्याने अब्दुल-रहमानच्या मानेवर चाकू ठेवला असता, त्याच्या कृतीने घोषित केले, “माझ्या ताक्दीत आता तू आहेस. सर्व डोळे हे पाहत आहेत; प्रत्येकाला माहित आहे की मला तुला मारण्याचा अधिकार आहे आणि तसे करण्याची क्षमता आहे. पण मी दया आणि सलोखा निवडतो. मी रक्त झगडा संपवतो.”
तो अब्दुल-रहमानपासून वळला आणि त्याऐवजी मेंढा कत्तल केला. जेव्हा तीव्र वेदना, क्रोध आणि न्याय मेंढ्याने शोषून घेतले, तेव्हा हबीबने अब्दुल-रहमानला मिठी मारली. दोन्ही कुटुंबामध्ये शांतता प्रस्थापित झाली.
जर मानवाला न्याय आणि दयेची सांगड घालण्याचे मार्ग सापडत असतील, तर देव नक्कीच तेच करू शकतो!
येशू हाच मशीहा: परमेश्वराकडून दया
देवाच्या दयेबद्दल आपण कोठे शिकू शकतो? हे फार सोपे आहे. तुम्ही कदाचित ऐकले असेल की येशू मशीहा (इसा अल-मसीह म्हणूनही ओळखला जातो) याला परमेश्वराकडून आलेली “दया” म्हटले जाते. याचा अर्थ तो दयेला पूर्णपणे मूर्त स्वरूप देतो. त्याचा मार्ग—शुभवर्तमानामध्ये त्याची शिकवण, ज्याला इंजील म्हणूनही ओळखले जाते—हा क्षमा आणि सलोख्याचा मार्ग आहे.
येशू मशीहा ही अशी अद्भूत भूमिका पार पाडू शकतो कारण देवाने पाठवलेला तो एकमेव आहे जो पूर्णपणे पापरहित आहे. प्रत्येक संदेष्टा आणि पवित्र संदेशवाहकाला त्यांच्या चुकांसाठी क्षमेची आवश्यकता होती, परंतु येशू मशीहाला नाही. त्याला थेट स्वर्गात नेण्यात आले, न्यायाच्या त्या दिवसाची वाट पाहण्याऐवजी कारण त्याने कधीही चूक केली नाही — अगदी लहानशी ही नाही.
या कारणास्तव त्याला म्हणतात देवाकडून दया . त्याने आपल्याला शुद्ध दयेचे उदाहरण दिले आणि देवाची दया कशी मिळवायची हे शिकवले.
येशू मशीहा मला कशी मदत करू शकतो?
अशी नोंद आहे की बाप्तिस्मा करणारा योहण (याला याह्या म्हणूनही ओळखले जाते) याने येशू मशीहाला गर्दीत पाहिले आणि देवाच्या प्रेरणेने मोठ्याने ओरडला, “पाहा!जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (शुभवर्तमान, योहण १:२९). येशू मशीहा त्या मेंढ्यासारखा आहे ज्याने अब्दुल-रहमानसाठी समेट घडवून आणण्याचा मार्ग तयार केला.
आम्हाला आमच्या चुकांची शिक्षा झाली तर, हा न्याय आहे. परंतु येशू मशीहा, जो पूर्णपणे पापरहित होता, त्याने आमच्या चुकांची जबाबदारी स्वेच्छेने घेतली. कोणीही त्याला जोर जबरदस्ती केली नाही. न्यायाच्या मागणीला उत्तर देण्यासाठी त्याने स्वेच्छेने स्वत:वर मरण पत्करले. तो एकमेव पूर्णपणे निर्दोष व्यक्ती होता जो आतापर्यंत जगला होता, आणि तरीही त्याने अब्दुल-रहमानच्या कथेतील मेंढ्याप्रमाणे वागण्याची त्यानी परवानगी दिली. म्हणूनच, त्याने आपल्यासाठी दुःख सहन केल्यानंतर, देवाने त्याला वर स्वर्गात घेतले.
कदाचित तुमच्या जीवनात संघर्ष आहेत. कदाचित तुम्ही फातिमासारखे असाल, तुमच्या प्रिय जनांनी तुम्हाला दूर टाकले आहे. कदाचित तुम्हाला एखाद्याने दुखावले असेल किंवा तुमची प्रतिष्ठा अयोग्यरित्या खराब केली असेल. कदाचित तुम्ही अब्दुल-रहमानसारखे आहात, दोषी आणि बदल्याला घाबरलेले असाल.
येशू मशीहा मदत करू शकतो. तुम्ही साधेपणाने अशी एक छोटीशी प्रार्थना करू शकता:
हे परमेश्वरा, मी माझ्या पापांची भरपाई कधीच करू शकत नाही. पण मला माहीत आहे की तू पाठवले आहेस येशू मशीहाला आमच्यावर तुझी दया म्हणून. त्याने सर्व मानवजातीसाठी केलेल्या चांगल्या कृत्यामुळे माझी क्षमा कर. येशू मशीहाचा मार्ग समजण्यास मला मदत कर जेणेकरून मी माझ्या जीवनात तुझी दया अनुभवू शकेन. आमेन.
जर तुम्हाला शुभवर्तमानची तुमची स्वतःची प्रत मिळवण्याची इच्छा असल्यास, तर कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.
Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.मराठी सुधारीत आवृत्ती (पुन्हा संपादित) बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५.
आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा
नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

तुमचे प्रेक्षक शोधा
वैशिष्ट्यीकृत प्रकाशने
© 2023 Sharing Hope Publications