
दुष्ट आत्म्यांपासून सुरक्षितता
सारांश
दुष्ट आत्मे शक्तिशाली आहेत, परंतु येशू मशीहासारखे शक्तिशाली नाहीत. या पत्रकात वर्णन केले आहे येशूने पीडित लोकांमधून भुते कशी काढली आणि त्यांना बरे होण्यास मदत कशी केली. तो आज आपल्यासाठीही असेच करू शकतो. त्याचे पुस्तक आपल्याला सैतानी छळ आणि दडपशाहीपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला माहित असणे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शिकवते. तो परत येण्याआधी आपण सैतानी प्रवृत्तीच्या लोकांकडून फसवणूक कशी टाळू शकतो हे देखील ते आपल्याला शिकवते.
प्रकार
पत्रिका
प्रकाशक
Sharing Hope Publications
21 भाषेमध्ये उपलब्ध
पृष्ठे
6
जिन्न सर्वत्र आहेत. तुम्ही त्यांना आत्मा, भूत, भुते किंवा जिन्न म्हणत असाल तरी ते भयानक असू शकतात. मुस्लिम फकीर, जादूटोणा, आणि ताबीज लोकप्रिय आहेत, परंतु ते खरोखर आपले संरक्षण करू शकतात का?
दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण मिळवण्याच्या तीन सोप्या पायऱ्या मी तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो जेणेकरून तुम्हाला घाबरण्याची गरज नही.
दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण
तो माणूस नग्न होता आणि ओरडत होता. त्याला अनेक जिन्नने पछाडले होते व कोणीही त्याला मदत करू शकत नव्हते. गावातील लोकांनी त्याला साखळदंडांनी बांधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने त्यांना अतिमानवी शक्तीने तोडले आणि थडग्यांमध्ये राहण्यासाठी पळून गेला. त्याने पूर्ण दिवस रडत आणि स्वतःला दगडाने कापून लोटले.
येशू ख्रिस्त नावाच्या माणसाच्या आगमनापर्यंत, ज्याला इसा अल-मसीह म्हणून देखील ओळखले जाते.
तो माणूस इतका पछाडलेला होता की त्याने मदतीसाठी तोंड उघडले तेव्हा जिन्नने येशू ख्रिस्ताला त्याला एकटे सोडण्यासाठी ओरडले. परंतु येशू गेला नाही. त्याला माहीत होते काय घडत आहे. नीरभय, त्याने जिन्नला त्या मनुष्याला सोडण्यास आज्ञा केली.
“आम्हाला अथांग दरीत पाठवू नका!” जिन्नने भीक मागितली. त्यांनी जवळ असलेल्या डुकरांच्या कळपात जाण्याची विनंती केली. येशूने त्यांना त्या माणसाला सोडून अशुद्ध प्राण्यांमध्ये जाण्यास आज्ञा केली. ताबडतोब, त्या माणसाची बुद्धी परत आली आणि डुकरांचा संपूर्ण कळप एका कड्यावरून समुद्रात पळाला.
शेवटी तो माणूस मुक्त झाला. तो फार आभारी होता! पण ही एकच कथा नाही. येशू ख्रिस्ताची दुष्ट आत्म्यांवर अफाट शक्ती होती. तो जिकडे गेला, त्याने जिन्नने पछाडलेल्या लोकांना सोडवले. त्याने आपल्या अनुयायांना सैतानावर अधिकार दिला:
पाहा, मी तुम्हाला अधिकार देतो... शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर, आणि काहीही तुम्हाला इजा करणार नाही.तरीसुद्धा, आत्मे तुमच्या अधीन आहेत याचा आनंद मानू नका, तर आनंद करा कारण तुमची नावे स्वर्गात लिहिली गेली आहेत (शुभवर्तमान, ज्याला इंजील असेही म्हणतात, लूक १०:१९-२०) .
जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतो, तेव्हा आपल्याला या जीवनात सुरक्षितता मिळू शकते आणि येणाऱ्या जीवनाची हमी! दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्याच्या आपण तीन पायऱ्या पाहू.
पायरी १: येशू ख्रिस्ताच्या नावाच्या सामर्थ्याचा दावा करा
पहिली पायरी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावाने देवाचे संरक्षण मिळवणे. स्वतःहून, आपण शक्तीहीन आहोत. परंतु जेव्हा आपण आपल्या जीवनावर येशू ख्रिस्ताचे नाव घोषित करतो, तेव्हा दुष्ट आत्मे शक्तीहीन होतात! येशूने त्याच्या अनुयायांबद्दल म्हटले: “माझ्या नावाने ते भुते काढतील” (शुभवर्तमान, मार्क १६:१७) .
जर तुमचा मनापासून विश्वास असेल की येशू ख्रिस्त तुम्हाला मुक्त करेल, तर तो ते करेल! फक्त देवाला ही विनंती करा, “प्रभु, कृपया मला दुष्ट आत्म्यांपासून वाचव, तू ज्याला पाठवले आहेस त्याच्या नावाने, येशू ख्रिस्त!”
पायरी २: आतील आणि बाह्य शुद्धीकरण शोधा
येशू ख्रिस्ताने शिकवले की आपण सैतानाला कुठलेही स्थान देवू नये. तो म्हणाला, “जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही” (शुभवर्तमान, योहान १४:३०) . आपण आपले जीवन सर्व वाईट प्रभावांपासून देखील शुद्ध केले पाहिजे.
याचा काय अर्थ होतो की सैतानाला “आमच्यावर काही सत्ता नाही”? याचा अर्थ जेव्हा आपण त्याच्या मालकीची कोणतीही गोष्ट आपल्या अंतःकरणात किंवा घरांमध्ये ठेवत नाही. आपण अंधश्रद्धेच्या वस्तू आणि ताबीज फेकून दिले पाहिजे. आपण पोर्नोग्राफी, मादक पदार्थ आणि दारू यांसारख्या पापी दुर्गुणांपासून दूर राहिले पाहिजे. जर आपण मृतांशी बोलण्याच्या किंवा शाप देण्याच्या विधींमध्ये गुंतलेलो आहोत, तर आपण ही क्रिया त्वरित थांबवली पाहिजे. अशा प्रकारे, आपण आपले बाह्य वातावरण आसुरी प्रभावांपासून स्वच्छ करतो. मग, आपल्याला क्षमा करण्यासाठी आणि आतून शुद्ध करण्यासाठी आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे.
पायरी ३: तुमचे जीवन प्रकाशाने भरा
येशू ख्रिस्ताने तुम्हाला जिन्नच्या सामर्थ्यापासून मुक्त केल्यानंतर, त्याला तुमच्या जीवनाचा प्रमुख होण्यासाठी आमंत्रित करा. तुमचे हृदय रिकामे ठेवू नका. येशू ख्रिस्त म्हणाला,
जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून निघून जातो, तेव्हा तो विसावा शोधत कोरड्या जागेतून जातो, पण त्याला सापडत नाही. मग तो म्हणतो, “मी ज्या घरातून आलो होतो तिथे मी परत येईन.” आणि जेव्हा तो येतो तेव्हा त्याला ते रिकामे, झाडून आणि व्यवस्थित केलेले आढळते. मग तो जातो आणि आपल्यापेक्षा दुष्ट आणखी सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन जातो, आणि ते तेथे येतात आणि राहतात.आणि त्या माणसाची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट आहे (शुभवर्तमान, मत्तय १२:४३-४५) .
तुम्ही जिन्न पासून शुद्ध झाल्यावर, तुमचे जीवन येशूचे पुस्तक, बायबलच्या प्रकाशाने भरून टाका. येशू ख्रिस्त “जगात प्रकाश म्हणून आला, यासाठी की जो कोणी [ त्याच्यावर] विश्वास ठेवतो तो अंधारात राहू नये” (शुभवर्तमान, योहण १२:४६) . येशूच्या पुस्तकाची एक प्रत मिळवा आणि ते दररोज वाचा जेणेकरून त्याचा प्रकाश हा अंधार दूर करेल.
भविष्यासाठी सुरक्षितता
आपण काळाच्या शेवटच्या जवळ जगत आहोत आणि दुष्ट आत्मे नेहमीपेक्षा जास्त सक्रिय आहेत. येशू ख्रिस्ताने असे भाकीत केले होते की तो परत येण्यापूर्वी, दुष्ट शक्ती विश्वासणाऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक खोटे चमत्कार करतील. काहींना, जिन्न भूतांच्या भयानक रूपात दिसतील; इतरांना, ते देवदूत किंवा मृत नातेवाईक म्हणून दिसतील. सैतान स्वतः येशू ख्रिस्ताची नक्कल करेल!
पण तुम्हाला खोट्या गोष्टींनी फसण्याची गरज नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताचे अनुसरण केल्यास, तो तुम्हाला सैतानाचा प्रतिकार करण्याची शक्ती देईल. प्रिय मित्रा, आज तुझा संघर्ष काहीही असो, येशू ख्रिस्त तुला मुक्त करू शकतो!
जर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या अनुयायाने दुष्ट आत्म्यांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी असे वाटत असेल, तर कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.
Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.मराठी सुधारीत आवृत्ती (पुन्हा संपादित) बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५.
आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा
नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

तुमचे प्रेक्षक शोधा
वैशिष्ट्यीकृत प्रकाशने
© 2023 Sharing Hope Publications