न्यायनिवाड्यात निर्भय

न्यायनिवाड्यात निर्भय

सारांश

न्यायाच्या दिवसाचा विचार केल्याने पुष्कळ लोकांच्या ह्रदयात भीती निर्माण होते. हिशेबाच्या त्या शेवटच्या दिवसातून आपण सुरक्षितपणे पार पडू याची आपण खात्री कशी बाळगू शकतो? देवाने सांगितले की तो आम्हाला एक वकील देईल—कोणीतरी न्यायनिवाड्यात आमच्यासाठी मध्यस्थी करेल ज्या प्रकारे एक वकील पृथ्वीवरील न्यायालयात आमच्या केसची बाजू मांडतो. हे पत्रक आमची या वकिलाशी ओळख करून देते आणि येत्या न्यायनिवाड्याचा विचार करत असताना आश्वासन कशे असावे हे शिकवते.

डाउनलोड करा

एके सकाळी एका महत्त्वाच्या मीटिंगला जाण्यासाठी मी हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडलो. मला उशीर झाला होता आणि म्हणून मी वेगाने गाडी चालवली - परवानगी असलेल्या वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने. अर्ध्या वाटेवर असताना, एका पोलिस अधिकाऱ्याने मला बाजूला घेतले आणि सांगितले की मला पोलिस स्टेशनला जावे लागेल! मी खूप घाबरलो आणि मला असहाय्य वाटले कारण मला माहित होते की मी दोषी आहे. 

पोलिस अधिकाऱ्याने माझ्याविरुद्ध केसची फाइल उघडल्यानंतर, मला समन्स बजावण्यासाठी जवळच्या न्यायालयात नेण्यात आले. तिथे वकील म्हणून काम करणाऱ्या एका मित्राशी माझी भेट झाली. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले. मी माझी परिस्थिती सांगितल्यावर तो म्हणाला, “काळजी करू नकोस. मी तुझी केस हाताळेन.” मला फार आनंद झाला. स्वतः माझा मित्र माझा वकील असणार!

कारण माझ्या मित्राने माझ्या बाजूने वकिली केली, न्यायाधीशानी कमीत कमी दंड ठोठावला. देवाची स्तुती करत मी न्यायलयातून निघालो.

पृथ्वीवरील न्यायाधीशासमोर उभे राहणे खरोखरच भयानक आहे. पण न्यायाच्या महान दिवशी देवासमोर उभे राहणे कसे असेल याच्या तुलनेत हे काहीच नाही. जर तो दिवस उद्या असेल, तुम्ही तयार असाल का?

न्यायाची तयारी करने

काही लोक येणार्‍या न्यायनिवाड्याला निष्काळजी वृत्तीने प्रतिसाद देतात. ते दारू पितात, धुम्रपान करतात, जुगार खेळतात, नाईट क्लबमध्ये जातात आणि वाईट व्हिडिओ पाहतात. त्यांना माहीत असेल की या गोष्टी नोंदणीच्या पुस्तकात लिहिल्या जात आहेत, परंतु ते सैतानाच्या (ज्याला शैतान देखील म्हणतात) भ्रमात अडकले आहेत. त्यांना परवा नाही.

इतर लोक अति भीतीने प्रतिसाद देतात. त्यांची एकही प्रार्थना चुकण्याचे धाडस होत नाही. ते थडग्याच्या यातना किंवा नरकाच्या अग्नीचा इतका विचार करतात की ते देवाचे प्रेम आणि दयाळूपणा विसरतात. 

पण जसा मला कायद्याच्या कोर्टात वकील होता, तसाच देवाने एक वकील दिला आहे जो आम्हाला न्यायनिवाड्यामधून जाण्यास मदत करेल. तुम्हाला एकटे राहण्याची आवश्यकता नाही!

आमचा वकील कोण आहे?

वकिलाची ही कल्पना नवीन नाही. दरवर्षी हजारो यात्रेकरू उत्तर आफ्रिकामधील, मध्य पूर्व (आरब) आणि आशियातील देवस्थानांना भेट देतात. बरेच लोक महान पुढाऱ्यांच्या कबरीवर प्रार्थना करतात, विश्वास ठेवून की ते त्यांच्या वतीने वकिली करतील. 

त्या महान नेत्यांचा आदर करणे चांगले आहे, परंतु त्यांना प्रार्थना करणे किंवा त्यांची मध्यस्थी मागणे पूर्णपणे हराम आहे. ते मरण पावलेत आणि तूमच्यासाठी काहीही करू शकत नाही. संदेष्टे देखील त्यांच्या कबरीत आहेत, पुनरुत्थानाच्या दिवसाची वाट पाहत.

मृतांना आपल्यासाठी मध्यस्थी करण्यास सांगणे हे हराम असले तरी, मध्यस्थीची कल्पना स्वतः योग्य आहे. परंतु देवाला कोणाची मध्यस्थी मान्य आहे? तो असा असला पाहिजे जो आहे 

१. जीवंत (कारण मृत आपल्यावतीने वार्ता करू शकत नाही) 

२. निष्पाप (कारण आज्ञाने दोषी ठरवलेला व्यक्ती इतरांची वकिली करू शकत नाही) .

ह्या पात्रता कोण पूर्ण करू शकेल? प्रिय येशू ख्रिस्ताशिवाय दुसरे कोणीही नाही, ज्याला इसा अल-मसीह असेही म्हणतात, जो स्वर्गात जिवंत आहे आणि पूर्णपणे शुद्ध आहे. 

याचा विचार करा—असे कोणी आहे का जो पापरहित असल्याचा दावा करू शकेल? आदामाने निषिद्ध फळ खाल्ले; नोहा (नूह) द्राक्षारसाने मस्त झाला; अब्राहम (इब्राहिम) खोटे बोलला; मोशेने (मुसा) एका माणसाचा खून केला; दाविदाने (दाऊद) दुसऱ्या माणसाची बायको चोरली. तुम्हाला एकही संदेष्टा सापडणार नाही ज्याने कधीही, एकही चूक केली नाही किंवा त्याला कधीही क्षमा मागावी लागली नाही.

परंतु येशूने कधीही पाप केले नाही. त्याने स्वत: असा दावा केला की, “ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे...कारण मी नेहमी तेच करतो जे त्याला आवडते” (शुभवर्तमान, ज्याला इंजील असेही म्हणतात, योहण ८:२९) . 

न्यायनिवाड्याचा सामना शांततेने करणे

येशू ख्रिस्त हा स्वर्गामद्धे जीवंत आणि संपूर्णपणे निष्पाप आहे. तो माझी आणि तुमची वकिली करायला तयार आहे. आणि तो लवकरच पुन्हा येणार आहे.

जर तो दुसऱ्यांदा परत येणार आहे, तर याचा अर्थ येशू ख्रिस्त हा अंतिम संदेष्टा आहे. होय, आणि एका संदेष्ट्यापेक्षाही अधिक - तो न्यायाच्या दिवशी आमचा वकील, गुरु, आणि शांतता आहे. त्याने आम्हाला सांगितले, “खूप खात्रीने ... जर कोणी माझे वचन पाळील तर तो कधीही मृत्यू पाहणार नाही” (शुभवर्तमान, योहण ८:५१) . 

येशू मृत  अवस्थेत नाही; तो जिवंत आहे! आणि तो आजही पृथ्वीवर आपली प्रजा तयार करत आहे. काहीवेळा तो आपल्याला त्याच्या प्रजेमध्ये आमंत्रित करतो स्वप्नात पांढऱ्या वस्त्राच्या माणसाच्या रूपात दिसून किंवा जेव्हा आपण देवाला त्याच्या नावाने प्रार्थना करतो तेव्हा चमत्कार देऊन. 

तुम्हाला न्यायाच्या दिवशी शांतता हवी आहे का? येशू ख्रिस्तावरील तुमचा विश्वास कबूल करा. जे मेलेले आहेत आणि न्यायाच्या दिवशी त्यांचे काय होईल हे माहित नसलेल्यांवर आपण आपली खात्री का ठेवावी? येशूला स्वर्गात त्याच्या स्थानाची खात्री आहे. कोर्टरूममधील माझ्या वकील मित्राप्रमाणे, तो आम्हाला मदत करेल.

आपण कदाचित विचार करत असाल की काहीतरी इतके आश्चर्यकारक खरे असू शकते का. येशू ख्रिस्त म्हणाला, “जर तुम्ही माझ्या नावाने काही मागाल तर मी ते करीन” (शुभवर्तमान, योहान १४:१४) . मी तुम्हाला जे सांगत आहे ते खरे आहे की नाही हे शोधण्यासाठी एक चाचणी करा. जर येशू आत्ताच जीवनातील आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्याइतका सामर्थ्यवान असेल, तर नक्कीच तो आपला वकील असेल यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. येशूच्या नावाने देवाला प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना करा आणि काय होते ते पहा. तुम्ही प्रार्थना करा:

हे प्रभु, मला हे जाणून घ्यायचे आहे की येशू खरोखरच ज्याला तू न्यायनिवाड्यात आमचा वकील म्हणून तू नियुक्त केले आहेस. जर ते खरे असेल, तर कृपया माझ्या प्रार्थनेचे उत्तर द्या (तुमची गरज येथे समाविष्ट करा) . हे मी प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन.

तुम्हाला येशू ख्रिस्ताचे अनुसरण कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती (पुन्हा संपादित) बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५.

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover