अंतिम सुटका

अंतिम सुटका

सारांश

असे दिसते की दुःख कायमचे राहील, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की ते एक दिवस संपेल. त्याने वचन दिले पृथ्वीवर परत येण्याचे आपल्या लोकांना “स्वर्गाचे राज्य” नावाच्या ठिकाणी नेण्यासाठी. या अद्भुत ठिकाणी दु:ख नाही, मृत्यू नाही आणि पुनर्जन्माचे चक्र नाही. आपण निर्माणकर्ता देवासोबत सदैव जगू! आपल्या अंतिम सुटकेसाठी आपण कसे तयार होऊ शकतो ते हे पत्रक आपल्याला सांगते.

डाउनलोड करा

गंगेच्या किनाऱ्यावर, अंत्येस्टी विधी दरम्यान, एक पुजारी मृत आत्म्याचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात त्याच्या अंतिम नशिबाच्या दिशेने प्रवास स्पष्ट करत आहे तथापि मोक्ष. गर्दीतला एक लहान मुलगा बारकाईने ऐकतो. त्याच्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीकडे वळून तो अचानक विचारतो, “हे कधी संपेल?”

तो असा प्रश्न विचारतो की ज्याने अनेकांना विचारात पाडते. वेदनादायक चक्रातून बाहेर पडण्यापूर्वी किती जन्म आणि पुनर्जन्म आवश्यक आहेत? हे इतिहासात असंख्य वेळा विचारले गेले आहे, आणि अद्याप कोणतेही अचूक उत्तर दिले जाऊ शकत नाही.

या पृथ्वीतलावर जन्म, मृत्यू आणि दुःखाची चक्रे सामान्य आहेत. परंतु या जगाच्या पलीकडे, ज्या ठिकाणी देव अस्तित्वात आहे, तेथे कोणतेही वेदनादायक चक्र नाहीत—केवळ शाश्वत, अनंत आनंद. कृतज्ञतापूर्वक, वेदना आणि त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी लाखो मृत्यू आणि पुनर्जन्म पार करणे आवश्यक नाही. मी तुम्हाला एका अतिशय उत्साही गोष्टीबद्दल सांगतो.

दु:खापासून कायमची सुटका!

फार पूर्वी प्रभू येशू मानवी रूपाने या जगात आला. त्याने आजारी लोकांना बरे केले आणि इतर अनेक आश्चर्यकारक गोष्टी केल्या. त्याने “स्वर्गाचे राज्य” नावाच्या एका खास जागेबद्दलही शिकवले. ते म्हणाले की स्वर्ग हे एक असे ठिकाण आहे जिथे आजार नाही, दुःख नाही आणि पुनर्जन्माची गरज नाही. त्या सुंदर ठिकाणी प्रत्येकजण सदैव राहतो.

प्रभु येशूने या अद्भुत राज्याबद्दल शिकवले, आणि नंतर त्याने आपल्या वाईट कृत्यांच्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी आपले जीवन बलिदान म्हणून दिले जेणेकरून आपण इच्छित असल्यास तेथे जाऊ शकतो.

त्याच्या बलिदानाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी, तो कबरेतून उठला आणि स्वर्गाच्या राज्यात गेला. त्याने त्याच्या अनुयायांना वचन दिले की तो त्यांना स्वर्गात नेण्यासाठी युगाच्या समापतीस पुन्हा येईल.

हे वाटत नाही का एक अद्भुत भविष्य? आपल्यापैकी प्रत्येकाने सुटका मिळवावी अशी येशूची इच्छा आहे—दुःखापासून कायमचे सुटण्यासाठी. पण लहान मुलाने “हे कधी संपते” असे विचारले म्हणून, आम्हाला देखील विचार पडतो की आम्हाला सुटका होण्यासाठी किती वेळ लागेल.

प्रभु येशू ख्रिस्ताचे पुनरागमन

विशेष म्हणजे, प्रभू येशूच्या शिष्यांनीही हाच प्रश्न विचारला—हे कधी संपेल? प्रभू येशूने या युगाच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन करताना सांगितले की तीव्र भूकंप, युद्धे, उपासमार, पीडा आणि रोगराई यांचा काळ येईल. लोकांची अंतःकरणे भीतीने खचतील जेव्हा ते त्रास वेगाने वाढत आहे असे पाहतील. ही प्रभू येशूच्या येण्याची चिन्हे असतील. आता आपण पाहू शकतो की आपण युगाच्या शेवटी जगत आहोत कारण ही सर्व चिन्हे घडत आहेत.

लवकरच, प्रभु येशू त्याच्या अभिवचनानुसार परत येईल. मृतांना पृथ्वीवरून उठवले जाईल आणि त्यांना परिपूर्ण नवीन शरीरे दिली जातील, जसे पवित्र शास्त्रामध्ये म्हटले आहे, “कारण, आज्ञाध्वनि आद्यदेवदूताच्या वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्यें जे मेलेले आहेत ते पहिल्यानें उठतील” (पवित्र शास्त्र, १ थेस्सलनीकरास पत्र ४:१६).

त्या वेळी, जे जग आपण जाणतो त्या जगाचा नाश होईल, आणि वाईटाला काढून टाकण्यात येईल. आपण एक हजार वर्षांच्या आनंदासाठी स्वर्गात जाऊ. मग, प्रभू येशू जगाला सौंदर्य आणि परिपूर्णतेमध्ये पुन्हा निर्माण करेल—मृत्यू, वेदना, आजारपण, नैराश्य आणि एकाकीपणापासून मुक्त. आणि त्याने वचन दिले की जो कोणी त्याच्या मार्गाचे अनुसरण करतो तो तेथे असेल. हा येशूचा मार्ग आहे.

अंतिम सुटका

येशूने त्याच्या परतण्याचा नेमका दिवस किंवा तास प्रकट केला नाही, परंतु त्याने त्याच्या अनुयायांना अनेक विशिष्ट चिन्हे दिली, ज्यावरून आपल्याला माहित आहे की त्याचे आगमन अगदी जवळ आहे—कदाचित तुमच्या आणि माझ्या आयुष्यात. किती उत्तम बातमी! प्रभु येशूच्या आगमनावेळी, आपण आपल्या वाईट कृत्यांच्या परिणामांपासून मुक्त होऊ!

जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार्‍यांपैकी व्हायचे असेल, त्याचे अनुसरण करण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या आहेत.

येशूचा मार्ग:

१. प्रभु येशूवर विश्वास ठेवा. जेव्हा येशूने आपला प्राण बलिदान म्हणून दिला, तेव्हा त्याने प्रत्येकाच्या वाईट कृत्यांचे परिणाम भोगले. त्याने हे स्वेच्छेने केले जेणेकरून तो आपल्याला त्यांच्यापासून मुक्त करू शकेल. तुम्ही ही देणगी पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेऊन त्याचा स्वीकार करू शकता.

२. एक वैयक्तिक संबंध विकसित करा. प्रभु येशूची इच्छा नाही की आपण केवळ धार्मिक कर्तव्यांच्या वेळापत्रा प्रमाणे पालन करावे; आपण त्याला वैयक्तिकरित्या ओळखावे अशी त्याची इच्छा आहे. जसे आपण एखाद्या जवळच्या मित्राशी बोलतो, आपले अंतःकरण उघडतो आणि आपली सर्व रहस्ये सामायिक करतो तसे आपण त्याला प्रार्थना करू शकतो. प्रभु येशूने त्याच्या आत्म्याद्वारे दररोज आपल्याबरोबर राहण्याचे अभिवचन दिले आहे, म्हणून आपण कधीही त्याच्याशी बोलू शकतो.

३. प्रभु येशूच्या शिकवणुकीचे पालन करा. येशूने सांगितले की आपण त्याच्या आगमनासाठी सावध आणि तयार असले पाहिजे. प्रभु येशूला भक्तीपूर्ण जीवन जगण्याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे, त्याच्यावर मनापासून प्रेम केले पहिजे आणि ढगांमध्ये त्याला पाहण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. शास्त्रामध्ये, प्रभू येशूचे अनुयायी होण्यासाठी आपल्याला माहित असणे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला आढळतील.

जर तुम्हाला अधिक माहिती ह्या येशूच्या मार्गावर चालण्याची हवी असेल त्याच्या पुन्हा येण्याच्या तयारी करिता, कृपया या पेपेरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती पुन्हा संपादित बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५. 

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover