माझ्या वेदनांसाठी न्याय

माझ्या वेदनांसाठी न्याय

सारांश

दु:ख सदैव टिकणार नाही. हे पत्रक एका धडपड करणाऱ्या बलात्कार पीडितेबद्दल बोलते. ती अंतिम न्याय दुष्टांवर निर्माणकर्ता देव आणणार हा विचार करत आहे. यात येशूने ढोंगी नेत्यांची निंदा कशी केली आणि ज्यांनी दुःख सहन केले त्यांच्या बाजूने न्यायाचे वचन दिले याचे वर्णन केले आहे. परंतु जर आपण स्वतः चूक केली असेल, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी सहन केलेल्या दु:खातून आपल्याला क्षमा करण्याचा एक मार्ग देखील आहे.

प्रकार

पत्रिका

प्रकाशक

Sharing Hope Publications

8 भाषेमध्ये उपलब्ध

पृष्ठे

6

डाउनलोड करा

विमला सरळ पलंगावर बसली, तिचे हृदय धडधडत होते. आणखी एक भयानक स्वप्न! दर काही दिवसांनी, भयानक आठवणी तिच्या स्वप्नात शिरत असे—एका माणसाच्या आठवणी ज्याने ती फक्त १२ वर्षांची असताना तिचा गैरफायदा घेतला.

विमला तो दिवस विसरू शकली नव्हती. तिला लाज वाटली आणि घाण वाटले आणि तिने सहन केलेल्या वेदनांबद्दल कोणालाही सांगितले नाही. विमला महाविद्यालयात दाखल झाली, पण भयानक स्वप्नं तिच्या मागे लागली होती. तिला त्या माणसाचा तिरस्कार वाटत होता आणि तिला आशा होती की त्याला जे पात्र आहे ते त्याला मिळेल.

कठीण प्रश्न

विमलाचे मन प्रश्नांनी व्याकुळ झाले होते. तिच्या बलात्काऱ्याला कर्माने न्याय मिळेल का? तो तिच्या शहरातील एक सुप्रसिद्ध पवित्र पुरुष होता. त्याने लोकांसाठी पुष्कळ चांगली कृत्ये केली, अनेकदा उपवास केला आणि देवतांची खूप भक्ती केली. एखाद्या वाईट कृत्याने त्याच्या सर्व चांगल्या कृत्यांच्या तुलनेत फरक पडेल का? तिला कर्माचे नियम कसे कार्य करतात हे माहित नव्हते, परंतु तिला माहित होते की त्याच्या वाईटाने फरक केला आहे तिला. विमला तिची वेदना विसरू शकली नाही.

न्याय शोधणे

विमलाच्या वर्गमित्रांपैकी एक सायरा हिने गरजू महिलांना मदत करणाऱ्या संस्थेत इंटर्नशिप केली होती. एके दिवशी, सायराने तिला विधवा, पीडित महिला आणि बलात्कार पीडितांना मदत करणाऱ्या केंद्राला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी येण्याचे आमंत्रण दिले. विमला घाबरली आणि तिला आश्चर्य वाटले की कोणाला तिचे भयानक रहस्य माहित आहे का. परंतु सायरा इतकी दयाळू वाटली की विमलाने जाण्याचा निर्णय घेतला. ते जाताना सायराने तिला गेल्या काही दिवसांत पाहिलेल्या काही जखमी महिलांबद्दल सांगितले.

“तुम्ही कधी गुरूंनी अत्याचार केलेल्या स्त्रिया पाहिल्या आहेत का?” विमलाने लाजत विचारले.

“होय, कधी कधी, ” सायराने उत्तर दिले. “हे खूप दुखदाई आहे. कोणीतरी धार्मिक असल्याचा दावा करतो याचा अर्थ असा नाही की तो देवाशी जोडला गेला आहे.”

“ते खरे आहे. . . .”

“माझे गुरू, महागुरू म्हणाले की आपल्या काळात धार्मिक जग खूप भ्रष्ट होईल. आपण भ्रष्ट धर्मापासून दूर येऊन निर्मात्या देवाशी जुडलो पाहिजे. तो आपल्याला शुद्ध अंतःकरण देईल आणि आपल्या वाईट कृत्यांची क्षमा करेल. मग आपण अशा लोकांपैकी असू ज्यांनी देवाला या ग्रहाची पुनर्निर्मिती करताना पहिले आहे दुष्ट लोक नसलेले एक परिपूर्ण स्थान.”

“हे खूप मनोरंजक वाटतं. तुझे गुरु कोण आहेत?”

“मी प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करते. ते एक महान शिक्षक होते, परंतु ते देव अवतारही होते. तुला त्याच्याबद्दल माहीत आहे का?”

“मला वाटतं मी बाजारात त्याची काही छायाचित्रे पाहिली आहेत, पण मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. त्याने आणखी काय सांगितले?”

बस रस्त्याच्या किनाऱ्याला थांबवण्यात आली. “चल आत जाऊया, ”सायरा म्हणाली, “आणि मग मी तुला आणखी सांगेन.”

आध्यात्मिक ढोंगीपणा

विमला आणि सायरा बसमध्ये चढल्या आणि त्यांना एकत्र बसण्याची जागा मिळाली.

“येशूने धार्मिक ढोंगीपणाच्या हानिकारक प्रभावांबद्दल बरेच काही सांगितले,” सायरा म्हणाली. तिने तिच्या पर्समधून प्रभु येशूचे एक छोटेसे पुस्तक काढले आणि ते उघडले. “ते इथे काय म्हणते ते पहा,” तिने इशारा केला. विमलाने वाचले,

शास्त्री आणि परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता आणि ढोंगासाठी लांबलचक प्रार्थना करता. त्यामुळे तुम्हाला अधिक दोष मिळेल (बायबल, मत्तय २३:१४).

“शास्त्री आणि परुशी कोण आहेत?” तिने विचारले. सायराने स्पष्ट केले, “ते प्रभु येशूच्या काळात गुरूसारखे होते, पण ते खूप भ्रष्ट होते.” विमलाने होकार दिला आणि वाचत राहिली.

शास्त्री आणि परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता, पण आत ते लुबाडणूक आणि स्वार्थाने भरलेले असतात. आंधळ्या परश्यांनो, प्रथम प्याला आणि ताटाच्या आतील बाजू स्वच्छ करा, जेणेकरून ते बाहेरील देखील स्वच्छ होतील (मत्तय २३: २५,२६).

शाश्वत न्याय

सायरा म्हणाली, “निर्माता देव आपल्याला सावधगिरी बाळगण्यास सांगतो कारण आध्यात्मिक ढोंगीपणा आजही आपल्यामध्ये आहे. प्रभू येशूचे पुस्तक म्हणते की आपल्या काळात जग, आणि अगदी धार्मिक व्यवस्थाही खूप भ्रष्ट असतील. पण देव जेव्हा जगाची पुनर्निर्मिती करेल तेव्हा दुष्टांचा न्याय करेल.”

“तो नक्की कसा न्याय देईल असे तुम्हाला वाटते?” विमलाने उत्तर दिले.

“प्रभु येशूचे पुस्तक असे सांगते की देव, प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची नोंद एका पुस्तकात करतो,” सायराने स्पष्ट केले. “युगाच्या शेवटी, प्रभु येशू ख्रिस्त मेघावर येणार आहे. सर्वजण त्याला पाहतील. पुस्तकात जे लिहिले आहे त्यानुसार तो आपल्या प्रत्येकाचा न्याय करेल.”

विमला उत्सुक होती. “पण आपल्या वाईट कृत्यांबद्दल आपण काय करावे?” तिने विचारले.

ते त्यांच्या स्टॉपवर पोहोचले आणि बसमधून बाहेर पडताच सायरा हसली. “हा सर्वोत्तम भाग आहे. प्रभु येशू पापार्पण म्हणून मरण पावला आणि नंतर पुन्हा जिवंत झाला. त्याने वचन दिले की जर आपण आपल्या पापांची कबुली दिली आणि त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवला, तर त्याचे जीवन अर्पण करण्याचे त्याचे चांगले कृत्य इतके शक्तिशाली आहे की त्या पुस्तकातून आपली सर्व वाईट कृत्ये पुसून टाकले जातील.”

न्यायाचा सर्वोत्तम संदेश

उपेक्षित महिलांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या केंद्रापर्यंत त्या पोहोचल्या होत्या. रोजच्या जेवणासाठी बाहेर वाट पाहणाऱ्या गरीब, अशक्त विधवांकडे विमलाने पाहिले. तिला एक मध्यमवर्गीय स्त्री झटकन आत शिरताना दिसली, ती काळ्या चष्म्याच्या मागे काळे डोळे लपवण्याचा प्रयत्न करत होती. विमलाचे हृदय करुणेने पिळवटले. दुख होणारी ती एकटीच स्त्री नव्हती!

सायराच्या लक्षात आले. “तू ठीक आहे?”

“हो, मी ठीक आहे,” विमलाने उत्तर दिले. “परंतु मला असे वाटू लागले आहे की आपला प्रभु येशू लवकर यावा आपला न्यायाधीश म्हणून हे आवश्यक आहे. जर हे खरे असेल की तो वाईट लोकांना नाहीसा करणार आहे आणि चांगल्या लोकांना कायमचे राहण्यासाठी एका सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे, तर मी ऐकलेला हा सर्वोत्तम न्याय आहे!”

जर तुम्हाला प्रभु येशूच्या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती पुन्हा संपादित बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५. 

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover