जगाचा अंत: एक धक्कादायक भविष्यवाणी!

जगाचा अंत: एक धक्कादायक भविष्यवाणी!

सारांश

आपल्या जगाचे भविष्य हे रहस्य नाही. हे बायबलमध्ये, प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुस्तकात भाकीत केले होते. येशूने आपल्याला विशिष्ट चिन्हांवर लक्ष ठेवण्यास सांगितले जेणेकरून शेवट केव्हा आहे हे आपल्याला कळेल. जर आपण त्याच्या शिकवणींचे पालन केले आणि त्याच्यावर आपला विश्वास ठेवला तर आपल्याला भविष्याबद्दल खात्री असेल. हे पत्रक आपल्याला सांगते जगाचा अंत आणि अनंतकाळच्या प्रारंभासाठी कसे तयार राहायचे.

प्रकार

पत्रिका

प्रकाशक

Sharing Hope Publications

8 भाषेमध्ये उपलब्ध

पृष्ठे

6

डाउनलोड करा

अधिक आरामदायक स्थिती मिळण्यासाठी रमणदीपने त्याचे वृद्ध शरीर सरकवले. आजकाल त्याचे सांधे अधिकाधिक दुखत होते आणि जेव्हा त्याने भाताच्या शेताकडे पाहिले तेव्हा रंग एकत्र अस्पष्ट दिसत होते. त्याला त्याची सून जेवण बनवताना ऐकू येत होती आणि त्याला विचार पडला की त्याचे कुटुंब त्याला एक ओझे म्हणून पाहत आहे का? वृद्धत्व सोपे नव्हते—ना त्याच्यासाठी किंवा त्याच्या काळजी घेण्याऱ्यांंसाठी.

तो तरुण असताना त्याच्या गुरूंनी काय सांगितले हे त्याने ऐकले होते, जेव्हा तो मंदिराकडे चालू शकत होता, याचा त्याने विचार केला. त्याच्या गुरूने सांगितले की येथे चार जागतिक युगे आहेत—प्रत्येक उत्तरोत्तर वाईट होत जाते. अंतिम युग—कलयुग आहे—हे सर्वांत वाईट आहे, दुर्गुण, दुःख आणि अंधाराने भरलेले असेल. रमणदीपने उसासा सोडला. कदाचित कलयुग हे थोडेसे वृद्धावस्थेसारखे होते—जे एके काळी चांगले होते त्याचे अंतिम अध:पतन. भूकंप, रोग, खून, युद्धे यांमुळे लोक कसे मरत आहेत, ही बातमी त्याने ऐकली. जे मरण पावले नाहीत ते भौतिकवादी, उदासीन आणि अनैतिक बनत होते.

या दु:खदाई जगाचा अंत कधी होणार? त्याचे वृद्ध शरीर—आणि क्षीण होत असलेला ग्रह—पुनर्जन्म घेऊ शकते का?

पृथ्वीचे भविष्य सांगणे

मी तुम्हाला एका दैवी भाकीतकर्त्याशी ओळख करून देऊ इच्छितो, ज्याच्या भविष्याच्या चिन्हावर मी स्पष्टपणे विश्वास ठेवतो. त्याचे नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो मनुष्य म्हणून पृथ्वीवर आला, लोकांना बरे केले आणि स्वर्गाच्या राज्यात आपण कसा प्रवेश करू शकतो हे सर्वांना सांगितले. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यानी आपला प्राण बलिदान म्हणून दिला. मग, आश्चर्यकारकपणे, तो मृत्यूतून पुन्हा उठला! तो म्हणाला की जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले तर त्याचे बलिदान आपल्यासाठी क्षमा आणि मुक्ती प्राप्त करेल.

प्रभु येशूने आपल्या जगाच्या भविष्याविषयी सांगितले आणि असा दावा केला की तो या वर्तमान दुष्ट युगाचा अंत करेल. त्याचे पुस्तक, पवित्र शास्त्र, हे भविष्यवाणीने भरलेले पुस्तक आहे. शेवट जवळ आला आहे हे आपल्याला कसे कळेल याविषयी आपण त्याच्या भाकितांकडे लक्ष दिले पाहिजे.

जगाचा अंत

एके दिवशी, प्रभु येशूच्या विद्यार्थ्यांनी त्याला विचारले, “तुझ्या येण्याचे आणि युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय असेल?” (बायबल, मत्तय २४:३). प्रभु येशूने त्यांना सांगितले की युगाच्या समाप्तीच्या अगोदर चिन्हे आढळतील ज्यामुळे त्याचे आगमन जवळ आले आहे हे समजण्यास मदत होईल. या चिन्हां मध्ये समाविष्ट आहे:

खोटे तारणारे. प्रभु येशू म्हणाला, “तुम्हाला कोणीही फसवू नये याची काळजी घ्या.कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येतील आणि म्हणतील, “मी ख्रिस्त आहे आणि पुष्कळांना फसवतील” (मत्तय २४:४,५). मी प्रभू येशू असल्याचा दावा खोटे बोलणार्‍यांकडून आपली फसवणूक होऊ नये. त्याचे खरे आगमन जगभर दिसून येईल—“पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकणाऱ्या विजेप्रमाणे” (मत्तय २४: २७).—आणि संपूर्ण जग भयंकर आणि आश्चर्यकारक पीडांनी हादरल्यानंतर होईल.

युद्धे आणि युद्धांच्या अफवा. प्रभु येशू म्हणाला, “तुम्ही युद्धांबद्दल आणि युद्धांच्या अफवा ऐकाल. तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या; कारण या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत, पण शेवट अजून झालेला नाही. कारण राष्ट्र राष्ट्रावर आणि राज्य राज्यावर उठतील” (मत्तय २४:६,७). जसजसे आपण युगाच्या शेवटास पोहोचू, युद्धे अधिक वारंवार आणि अधिक तीव्र होतील.

दुष्काळ, भूकंप आणि रोगराई. त्याने भाकीत केलेले तिसरे चिन्ह म्हणजे “विविध ठिकाणी दुष्काळ, रोगराई व भूकंप होतील. या सर्व दु:खाची सुरुवात आहे” (मत्तय २४:७,८). शतकाच्या सुरुवातीपासून २० दशलक्षाहून अधिक लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. नेपाळमध्ये २०१५ मध्ये झालेल्या भूकंपमध्ये, ८,००० लोकांचा मृत्यू झाला होता, तो इतिहासातील सर्वात भयंकर होता. रोगाने असंख्य जीव घेतले आहेत. प्रभू येशूने काय भाकीत केले हे आपण नक्कीच पाहत आहोत.

नैतिक अध:पतन. प्रभु येशू म्हणाला, “कारण अधर्म वाढेल, पुष्कळांचे प्रेम थंड होईल” (मत्तय २४:१२). असा अंदाज आहे की भारतात दररोज सरासरी ९१ बलात्कार आणि ७९ हत्या होतात. लोक इतके आत्मकेंद्रित होत आहेत की त्यांच्या कृतीने इतरांना कसे दुखावले जाते याची त्यांना मुळीच पर्वा नाही.

प्रभू येशूने या सर्व चिन्हांची भविष्यवाणी केली होती जी त्याच्या गौरवाच्या मेघामध्ये परत येण्यापूर्वी होतील. जसे आपण ही चिन्हे घडताना पाहतो, तेव्हा आपल्याला कळते की त्याची भविष्यवाणी खरी आहे आणि त्याचे येणे अगदी जवळ आले आहे! 

प्रभू येशूच्या पुनरागमनाची तयारी!

जे लोक स्वार्थ, गर्व आणि अनैतिकतेत जगतात त्यांना प्रभु येशू आल्यावर आनंद होणार नाही. खरं तर, जेव्हा तो ढगांमध्ये परत येनार तेव्हा त्यांची सर्व वाईट कृत्ये एका विनाशकारी क्षनात त्यांच्यावर पडतील. ते त्याच्यापासून लपण्याचा प्रयत्न करतील आणि खडक आणि पर्वतांना ओरडतील, “आमच्यावर पडा आणि जो सिंहासनावर बसला आहे त्याच्यापासून आम्हाला लपवा!” (बायबल, प्रकटीकरण ६:१६).

परंतु ज्यांचा प्रभु येशूच्या बलिदानावर विश्वास आहे, ते त्या दिवशी त्वरित बदलतिल आणि त्यांना नवीन आणि अमर शरीर दिले जाईल. ते ढगांमध्ये तरंगतील आणि या अधोगती जगातून कायमचे सुटतील. जर तुम्हाला अशा चिरंतन आनंदी व्यक्तींपैकी एक व्हायचे असेल, तर तुम्ही आज ही साधी प्रार्थना करू शकता:

प्रिय निर्माणकर्ता देवा, माझा विश्वास आहे की प्रभु येशू लवकरच परत येणार आहे. कृपया मला प्रभू येशूला कसे जाणून घ्यायचे आणि त्यावर विश्वास कसा ठेवायचा हे शिकव जेणेकरून मी स्वर्गात नेलेल्या लोकांमध्ये असेल. आमेन.

तुम्हाला भविष्यातील प्रभु येशूच्या भविष्यवाण्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया या पेपेरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती पुन्हा संपादित बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५. 

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover