
क्षमा शोधने
सारांश
आयुष्यात आपण सर्वच चुका करतो. आपण कर्माच्या तीक्ष्ण दंशाची वाट पहावी, की दैवी क्षमा अशी काही गोष्ट आहे? हे पत्रक येशूच्या उधळपट्टीच्या पुत्राच्या बोधकथेची एक स्वदेशी आवृत्ती सांगते, जे दाखवते की निर्माणकर्ता देव पापींचे कसे खुल्या हातांनी स्वागत करतो आणि क्षणार्धात आयुष्यभराच्या पापांची क्षमा करू शकतो.
प्रकार
पत्रिका
प्रकाशक
Sharing Hope Publications
8 भाषेमध्ये उपलब्ध
पृष्ठे
6
प्रताप हा एक श्रीमंत जामीनदाराचा पुत्र होता. ते एक भव्य घरात रहात असे आणि त्यांचे अनेक चाकर होते. प्रतापला नेहमी उत्तम कपडे, भोजन आणि शिक्षण लाभले होते—त्याला माहीत होते त्याचे पालक त्याच्यावर फार प्रेम करत होते, विशेषता त्याचे वडील.
परंतु जसजसा प्रताप वाढला, तो बदलू लागला. जुने मार्ग त्याला आता आकर्षक नव्हते. वडिलांचे घर आणि वडिलांचे मार्ग प्रतिबंधात्मक लागू लागले. प्रताप स्वातंत्र्यासाठी तळमळ करू लागला.
एके दिवशी प्रतापने आपल्या आईला विनवणी केली आपल्या पित्याला विशेष विनंती करण्या करिता. जेव्हा त्याने काय हवे आहे ते तिला सांगितले तेव्हा ती घाबरून मागे हटली. पण तिने विचारण्यास होकार देईपर्यंत त्याने तिला आग्रह केला. बरेच दिवस लागले, पण शेवटी ती रडत परत आली.
“तो ते करेल,” ती म्हणाली, ती तिच्या मुलाकडे बघू शकली नाही. “तो आपली अर्धी संपत्ती विकून तुला तुझे वतन देईल. पण का, माझ्या मुला? का?”
प्रतापला पश्चात्तापाची थोडी वेदना तर जाणवलीच, पण तो उत्साहित ही झाला. त्याची योजना यशस्वी झाली होती. त्याला वडिलाच्या पैशातील त्याचा वाटा मिळेल जेणेकरून तो त्याला हवे तसे जीवन जगू शकेल.
बेफाम जीवन
प्रताप मोठ्या शहरात गेला. त्याने एक महागडा पेंट हाऊस भाड्याने घेतला आणि नवीन मित्र बनवायला सुरुवात केली. लवकरच तो श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना आकर्षित करणार्या पार्ट्या देऊ लागला. त्याने कार विकत घेतल्या, सुंदर स्त्रियांसोबत संबंध ठेऊ लागला आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेऊ लागला. त्याला जे काही हवे होते ते सर्व त्याच्याकडे होते.
पण एके दिवशी प्रतापचे पैसे संपले. लाजत, त्याने त्याच्या काही नवीन मित्रांना त्याला थोडे पैसे उधार देण्यास विचारले, परंतु त्यांनी अचानक कॉलला उत्तर देणे बंद केले. तो त्याचे बिल भरू शकला नाही. शेवटी घरमालकाने त्याला हुसकावून लावले. पैसे नसताना आणि मित्र नसताना तो कुठे जाणार?
प्रताप, चिंतेत आणि गोंधळलेल्या स्थितीत, शहरात फिरू लागला. सूर्य मावळतीला लागला की त्याला भीती वाटू लागली. तो कुठे झोपणार? तो काय खाणार? आयुष्यात पहिल्यांदाच, प्रताप रस्त्यावर झोपला, त्याला कडक भुक लागली होती.
पश्चात्तापाचा सामना
पुढील काही दिवस प्रतापने शहरात नोकरीसाठी प्रयत्न केले. तो रस्त्यावर झोपलेला असल्या मुळे तो गबाळ दिसत होता, त्यामुळे त्याला कोणीही नोकरी दिली नाही, केवळ एका रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाशिवाय. प्रताप तासन तास काम करत असे, जेवणार्यांसाठी जेवण नेत असे आणि टेबल पुसत असे. त्याला खूप भूक आणि थकवा जाणवत होता. त्याला आश्चर्य वाटले की तो, एका श्रीमंत माणसाचा मुलगा, तो इतरांना अन्न वाढत होता, हे कसे शक्य आहे! शेवटचा जेवणारा रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर, भांडी धुण्यास मदत करण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला. कचऱ्याच्या डब्याजवळ एक अर्धी खाल्लेली चपाती एका थाळीत त्याला दिसली. त्याला एवढी भूक लागली होती की तो ती घेण्यासाठी जवळ पोहोचला.
हे माझ्या सोबत काय घडत आहे? त्यानी स्वत:ला कोसले. माझ्या वडिलाच्या घरातील नोकरांनाही खायला पुरेल एवढ्या चपात्या आहेत, त्याशिवाय अतिरिक्त. आणि मी इथे आहे, या घाणेरड्या उरलेल्या अन्नाच्या मोहात पडलो आहे!
तो भांड्यांच्या ढीगा कडे पाहत राहिला आणि बराच वेळ विचार करत राहिला.
मला माहित आहे मी काय करणार, त्यानी विचार केला. मी माझ्या वडिलाकडे परत जाईन आणि त्यांना सांगेन, “बाबा, मी तुमच्याविरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केले आहे. मी आता तुमचा मुलगा होण्याच्या लायकीचा नाही. कृपया मला तुमच्या नोकरांपैकी एक बनवा.”
एकही ताट न धुता, प्रतापने रेस्टॉरंट सोडले आणि घरी जाण्यास सुरुवात केली.
घरी परतने
घरी जाताना प्रतापने अनेक गोष्टींचा विचार केला. त्याला पाहून त्याच्या वडिलाची काय प्रतिक्रिया असेल? तो आल्यावर काय बोलेल याची त्याने पूर्वाभ्यास केला पण त्यामुळे त्याला काही बरे वाटले नाही. शेवटी, लांबच्या प्रवासानंतर, त्याला दूरवर त्याच्या वडिलाचे घर दिसले. तो हळू त्या रस्त्याने पुढे गेला.
अचानक त्यानी एक आरोळी ऐकली. त्याचे वडील, सहसा इतके शांत आणि प्रतिष्ठित, घराबाहेर पळत आले. ते प्रतापजवळ आले आणि त्याला घट्ट मिठी मारली. प्रतापला असे वाटले त्याचे हृदय तुटून पडेल.
“बाबा,” त्याचा कंठ भरून आला, “मी तुमचाविरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केले आहे. मी आता तुमचा मुलगा होण्याच्या लायकीचा नाही. . .”
वडिलानी एकही शब्द ऐकला नसल्यासारखा दर्शवले. अश्रु त्याच्या गालांवरून वाहू लागले. घरातल्या सेवकांनी गोंधळ ऐकला आणि ते धावत आले.
“लवकर!” वडिलाने त्यांना आज्ञा केली. “त्याची खोली तयार करा! त्याच्यासाठी नवीन पोशाख तयार करा! एक मेजवानी तयार करा, कारण आम्ही एक उत्सव साजरा करू! हा माझा मुलगा आहे—तो मेला होता आणि आता जिवंत आहे; तो हरवला होता आणि आता सापडला आहे!”
क्षमा शोधने
ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या बोधकथेवर आधारित आहे वर्णन करण्यासाठी आपण निर्माणकर्ता देवाकडून क्षमा कशी मिळवू शकतो. जेव्हा आपण जीवनात चुका करतो—अगदी मोठ्या चुका देखील—प्रताप आपल्या वडिलाकडे ज्या प्रकारे परत आला त्याच प्रकारे आपण देवाकडे परत येऊ शकतो. आम्हाला कठीण विधी किंवा यज्ञ करण्याची गरज नाही. देव खुल्या बाहुंनी आमची वाट पाहत आहे. त्याला सर्वात महत्वाचे म्हणजे आपले हृदय बदलणे हे आहे. आपण नम्रपणे आपल्या पापांची कबुली दिली पाहिजे, खरोखर खेद व्यक्त केला पाहिजे आणि क्षमा मागितली पाहिजे. तुम्हाला देवाच्या क्षमेचा दैवी चमत्कार अनुभवायला आवडेल का? आज, आत्ता, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीपासून तुम्ही शुद्ध होऊ शकता. तुम्ही अशी प्रार्थना करू शकता:
प्रिय देवा, मला माझ्या पापांसाठी मनापासून खेद वाटतो. कृपया मला क्षमा कर आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या महान बलिदानामुळे मला सर्व अशुद्धतेपासून शुद्ध कर. मला अंतरी एक नवीन व्यक्ती बनव. आमेन.
जर तुम्हाला प्रभु येशू ख्रिस्ताच्या शिकवणींबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.
Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा
नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

तुमचे प्रेक्षक शोधा
वैशिष्ट्यीकृत प्रकाशने
© 2023 Sharing Hope Publications