चमत्कारांचा एक दिवस

चमत्कारांचा एक दिवस

सारांश

विमलचे त्याच्या पत्नीसोबतचे तणावाचे संबंध अधिकच बिघडत चालले होते. पण एके दिवशी, त्याला शब्बाथबद्दल कळले, जो निर्माणकर्ता देवाच्या सन्मानार्थ एक विशेष पवित्र दिवस आहे. तो प्रभू येशूचे पुस्तक वाचू लागला आणि दर आठवड्याला शब्बाथ दिवस साजरा करू लागला. हळूहळू विमलचा राग वितळला आणि त्याच्या वैवाहिक जीवनात काहीतरी खास घडू लागले.

प्रकार

पत्रिका

प्रकाशक

Sharing Hope Publications

8 भाषेमध्ये उपलब्ध

पृष्ठे

6

डाउनलोड करा

विमल ने आपली ऑटो-रिक्षा रस्त्याच्या कडेला लावली. दिवसभर त्याचे बरेच ग्राहक असले तरी त्याला आनंद वाटत नव्हता. तो त्याच्या लग्नाचा विचार करणे थांबवू शकला नव्हता. ते ढासळत होते!

त्याचे त्याची पत्नी, सीमावर फार प्रेम होते—पण दर काही दिवसांनी तिला मारहाण करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकत नव्हता. तीने त्याला खूप रागाला आणले. त्याला ते करायचे नव्हते, पण तसे ते घडत असे.

धार्मिक विधी दरम्यान, सीमाला आत्म्याने पछाडले जायचे आणि ती जंगलीपणे नाचायची, तिच्या शरीरावरील नियंत्रण गमावायची आणि तिचे कपडे फाडायची. तिचा स्वतःवरचा ताबा सुटण्याचा मार्ग विमलला आवडला नाही. त्याने तिला विधीला जाणे थांबवण्यास सांगितले, परंतु तिने ऐकले नाही. जनावरांच्या बळी मुळे तिचे कपडे फाटलेले असे व तिच्या चेहऱ्यावर रक्त असे त्यानंतर ती घरी पोहचत असे, परंतु विमलला फार राग येत आणि तो तिला मारत असे.

सीमा दोनदा गरोदर राहिली पण तिच्या उन्मादक विधींमुळे तिचा गर्भपात झाला. ती अधिकाधिक हट्टी होत गेली आणि विमलला अधिक राग येत असे, त्याला उदास आणि अपराधी वाटू लागले.

एक चांगला मार्ग

विमल त्याच्या ऑटो-रिक्षात बसला होता तेव्हा त्याला एका चांगल्या मार्गाची फार इच्छा झाली. अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इमारतीतून त्याला आवाज आला. आत मुले आणि प्रौढ होते आणि कोणीतरी गोष्ट सांगत असताना, ते ऐकत होते.

कथाकाराने एका माणसाबद्दल सांगितले जो त्याच्या त्रासांपासून पळत होता. त्याने आपल्या जुळ्या भावाचा विश्वासघात केला आणि त्याला इतके मारले की त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटली. पळून जात असता तो अरण्यात झोपायला थांबला. त्याच्याकडे उशीकरिता दगडाशिवाय त्याला आराम देण्यासारखे काहीही नव्हते. आपल्या कुटुंबाशी असा वागण्याबद्दल आणि त्याने जे केले त्याबद्दल त्याला एकटेपणा आणि खेद वाटला.

विमलने लक्षपूर्वक ऐकले. या माणसाला कसे वाटले असेल ते त्याला माहीत होते.

कथाकार पुढे सांगू लागला. तो माणूस झोपला असता त्याला एक स्वप्न पडले. त्याला स्वर्गापर्यंत एक शिडी दिसली. देवदूत शिडीवरून वर-खाली जात होते, जणू या दुःखी, हृदय तुटलेल्या माणसाला आशीर्वाद आणत आहेत. जाग आल्यावर त्याला आनंदित वाटले. त्याने उशी म्हणून वापरलेल्या दगडाने आपल्या देवाचे स्मारक बांधले. शिडीच्या दर्शनाने त्याला पुन्हा एकदा देवाशी जोडलेले वाटले आणि त्याला माहित होते की सर्व काही ठीक होणार आहे.

एक नवीन पुस्तक

लोक निघून गेल्यावर विमलने लाजतकाजत इमारतीत प्रवेश केला.

“शब्बाथच्या शुभेच्छा,” कथाकाराने त्याला अभिवादन केले.

“शब्बाथ म्हणजे काय?” विमलने कुतूहलाने विचारले.

“आम्ही निर्माणकर्त्या देवाची उपासना करतो,” कथाकाराने उत्तर दिले. “आणि तो आपल्याला आठवड्याच्या सातव्या दिवशी, शब्बाथ दिवशी, उपासना करण्यास सांगतो, कारण त्याने सहा दिवसांत जग निर्माण केले. ज्याप्रमाणे माणसाच्या स्वप्नातील शिडीने स्वर्ग आणि पृथ्वी जोडली आहे, त्याचप्रमाणे शब्बाथ हा एक साप्ताहिक पवित्र दिवस आहे जो आपल्याला देवाशी जोडतो. जेव्हा आपण या दिवशी उपासना करतो तेव्हा आपण निर्मात्यावर आपली श्रद्धा दाखवतो आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करतो.”

जुळ्या भावांची कहाणीने विमलला स्पर्श झाला. “ही कहाणी तुम्हाला कोठे सापडली?”

“हे पवित्र शास्त्रामधून आहे, प्रभु येशू ख्रिस्ताचे पुस्तक,” कथाकाराने ते पुस्तक कपाटामधून काढून विमलला दिले. “तुम्ही ती कथा येथे वाचू शकता.”

विमलने त्या मनुष्याचे आभार मानले आणि ते पुस्तक घेऊन तो आपल्या घरी गेला. वाचताना त्याला शांत वाटले आणि तो पुढच्या शनिवारी परतला. तो शांतपणे बसला आणि त्याच्या पवित्र दिवशी निर्माता देवाची प्रार्थना करत असताना, त्याच्या हृदयात काहीतरी आश्चर्यकारक घडू लागले.

एक बदललेला मनुष्य

एके दिवशी, विमलने त्याचे नवीन पुस्तक वाचले तेव्हा त्याला एक वचन सापडले ज्यात म्हटले होते, “तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो हे तुम्हाला माहीत नाही का?” (बायबल, करिंथकरांस पहिले पत्र ३:१६). त्याच्या मनात अचानक प्रकाश पडला. कारण शरीर हे देवाचे मंदिर आहे,त्याने विचार केला,कुणालाही त्याचे नुकसान करण्याचा अधिकार नाही. मी यापुढे माझ्या पत्नीला मारहाण करता कामा नाही.

त्याने यापूर्वी अनेकदा थांबण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळी ते खरोखरच कामी आले. पवित्र शास्त्राचे वाचन आणि शब्बाथ दिवशी उपासना केल्याने तो निर्माणकर्त्या देवाशी जोडला गेला होता, ज्याने त्याचे हृदय बदलण्यास मदत केली हे त्याला माहीत होते. असे वाटले की एखाद्या दैवी हाताने त्याच्या छातीतून दगडी हृदय काढून त्याच्या जागी दयाळू हृदय त्या ऐवजी घातले आहे.

पुनर्मीलन

अनेक वर्षे, विमलने पवित्र शब्बाथ दिवशी निर्माणकर्त्या देवाची उपासना सुरू ठेवली. हळुहळू सीमाला तिच्या नवऱ्यात झालेला बदल लक्षात आला. त्याने तिला यापुडे मारहाण केली नाही. त्या ऐवजी, तो सौम्य व दयाळू होता.

तोपर्यंत सीमा खूप थकली होती आणि उदास झाली होती. प्रभू येशू ख्रिस्ताचे पुस्तक वाचून आणि शनिवारी भक्ति आटोपून घरी परतल्यावर विमल नेहमी शांत दिसत असल्याचे तिच्या लक्षात आले. शेवटी, जेव्हा त्याने तिला विचारले की तिला त्याच्यासोबत जायचे आहे का, तेव्हा तिने होकार दिला.

“शब्बाथ हा आमच्या कुटुंबासाठी विशेष पवित्र दिवस आहे,” विमल सांगतो. “तो एक दिवस आहे जेव्हा देव आपल्याला त्याच्याशी जोडण्यासाठी आमंत्रित करतो. जेव्हा आपण अशा प्रकारे त्याच्याशी जोडले जातो तेव्हा तो चमत्कार करतो. मला माहिती आहे माझी पत्नी आणि मी आज आमच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहोत कारण मी दररोज आणि विशेषतः शब्बाथ दिवशी निर्माणकर्त्या देवाची उपासना करायला शिकलो. शब्बाथचे आशीर्वाद आपल्याला देवाच्या आणि एकमेकांच्या जवळ आणतात.”

आज, विमल आणि सीमा दोन मुलांसह आनंदी विवाहित आहेत. ते त्यांच्या सर्व शेजाऱ्यांना शब्बाथ दिवसाच्या आशीर्वादांबद्दल सांगतात.

जर तुम्हाला शब्बाथबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल किंवा पवित्र शास्त्र मिळवायचे असेल, तर कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती पुन्हा संपादित बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५.

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover