देवाचे विशेष लोक

देवाचे विशेष लोक

सारांश

प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पुढील युगात एक परिपूर्ण जग कसे परत निर्माण करेल याबद्दल सांगितले आहे. त्याचे विशेष लोक तेथे सर्वकाळ राहतील. हे विशेष लोक कोण आहेत? बायबल त्यांना “अवशेष” म्हणते. या पत्रकात अवशेषांचे थोडक्यात वर्णन दिले आहे आणि ते सर्व कोणती घटना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत हे सांगते.

डाउनलोड करा

एका माणसाची कथा सांगितली जाते ज्याने लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या नोकरांना एकत्र जमा केले. एका सेवकाला त्याने पैशाची मोठी पिशवी दिली; दुसऱ्या नोकराला, पैशाची मध्यम आकाराची पिशवी; आणि तिसर्‍या नोकराला, पैशाची एक लहानशी पिशवी दिली—प्रत्येकजनास त्यांच्या क्षमतेनुसार. तो गेल्यावर त्याच्या मालमत्तेची काळजी घेतली पाहिजे असे त्याने त्यांना सांगितले. मग तो निघून गेला.

पहिल्या नोकराने त्याचे पैसे घेतले आणि त्याचा व्यापार सुरू केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या नोकराने आपला पैसा व्यवसायात गुंतण्यासाठी वापरला. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि लवकरच दोघांनी त्यांच्याकडे सोपवलेली रक्कम दुप्पट केली.

पण तिसरा नोकर, ज्याच्याकडे पैशाची अगदी छोटी पिशवी होती, तो वेगळा होता. त्याने जमिनीत एक खड्डा खणला आणि सुरक्षिततेसाठी पैसे पुरले—मग त्याने आराम केला, स्वामी दूर असताना अनेक आळशी वर्षांचा आनंद लुटला.

शेवटी, स्वामी परतला. पहिल्या दोन नोकरांनी त्याला दाखवले की त्यांनी किती कष्ट केले आणि त्याची मालमत्ता दुप्पट केली. तो म्हणाला, “शाबास! तुम्ही चांगले आणि विश्वासू नोकर आहात. तुम्ही छोट्या गोष्टींमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे आणि आता मी तुम्हाला मोठ्या गोष्टीं सोपविण.” त्यानंतर त्यानी त्यांना बक्षीस दिले.

तिसरा नोकर कचरत आणि लाजत पुढे आला. “स्वामी,” तो म्हणाला, “मला माहीत होतं की तुम्ही कठोर माणूस आहात, जिथे तुम्ही पेरले नाही तिथे कापणी करता आणि जिथे बी विखुरले नाही तिथे गोळा करता. मला भीती वाटत होती म्हणून मी जाऊन तुमचे पैसे जमिनीत लपवले. येथे, तुमच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे आहे—थोडेही गमावले नाही.” परंतु धन्याला राग आला कारण त्याला माहीत होते की ह्या आळशी नोकराने तो दूर असताना काहीही केले नाही. त्याने त्याचे पैसे घेतले, विश्वासूपणे काम करणाऱ्या नोकराला दिले आणि अविश्वासू नोकराला शिक्षेच्या ठिकाणी टाकले.

एक परीपूर्ण राज्य

ही कथा प्रभु येशू ख्रिस्ताने सांगितली होती, महान शिक्षक आणि कथाकार. त्याचे पुस्तक, पवित्र शास्त्र, आपल्याला सांगते की तो एके दिवशी मेघारूड परत येईल आणि त्याच्या खास लोकांना, त्याच्या सेवकांना, जे विश्वासू आहेत त्यांना मोठे प्रतिफल देईल. परंतु जे त्याच्या परत येण्याच्या तयारिस नाहीत, त्यांची खूप निराशा होईल.

देवाच्या विश्‍वासू सेवकांसाठी हे अद्‌भुत बक्षीस काय आहे? प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्याला “देवाचे राज्य” नावाच्या ठिकाणी नेण्याचे वचन दिले आहे. हे राज्य ते ठिकाण आहे जिथे निर्माता देव वस्ति करतो. हे एक परिपूर्ण ठिकाण आहे जिथे प्रत्येकजण संपूर्णपणी आनंदी आहे आणि जिथे देव मानवतेसह राहतो. या राज्यातील लोक देवाच्या नियमांनुसार आणि एकमेकांशी सुसंगत राहतात. दु:ख, वेदना किंवा मृत्यू तेथे नाही. हे अद्भुत राज्य कधीही संपणार नाही! परंतु केवळ विश्वासू आणि आज्ञाधारकांनाच या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. जे देवाला नाकारतात किंवा त्याची सेवा करण्यात आळशी व निष्काळजी असतात, ते त्याच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत.

देवाच्या राज्यात आपला मार्ग मिळवणे शक्य नाही. अनेक आयुष्यभर केलेल्या चांगल्या कृत्यांपेक्षा ते खूप महाग असेल.त्याऐवजी, निर्माता देव आम्हाला विनामूल्य भेट म्हणून प्रवेश देतो. कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकतो, मग त्यांची वंश, सामाजिक स्थिती किंवा भूतकाळातील इतिहास काहीही असो. परंतु जरी आपण चांगल्या कर्माने या राज्यात प्रवेश करू शकत नसलो तरी आपली कृत्ये महत्त्वाची आहेत. अशा परिपूर्ण, सुसंवादी ठिकाणी आपण आनंदी असणारे लोक आहोत की नाही हे पाहण्यासाठी देव आपली कृती पाहतो.

पवित्र शास्त्र लोकांच्या एका खास गटाचे वर्णन करते जे पहिल्या दोन सेवकांसारखे असतात—ते जे काही करतात त्यामध्ये विश्वासू असतात. हे विशेष लोक, ज्यांना “अवशेष” म्हटले जाते, ते जगातील प्रत्येक देशातील लोक आहेत जे देवाची आज्ञा पाळतात आणि प्रभु येशूच्या पुनरागमनासाठी उत्कटतेने पाहतात.

अवशेषात सामील होणे

आपण देवाच्या खास लोकांचा, विश्वासू सेवकांचा हा गट जो एके दिवशी देवाच्या राज्यात प्रवेश करणार आहे, त्याचा भाग कसा बनू शकतो? प्रभु येशूने आपल्याला देवाशी विश्वासू राहण्यास शिकवले, परंतु त्याने क्लिष्ट नियमांची एक लांब यादी तयार केली नाही. ते म्हणाले की आपण देवावर आपल्या सर्व अंतःकरणाने, आत्म्याने आणि मनाने प्रेम केले पाहिजे आणि आपण आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे प्रेम केले पाहिजे. (पहा बायबल, मत्तय २२: ३७–४०). हे सोपे वाटेल, परंतु आपल्यापैकी बहुतेकांना प्रेमळ नसलेल्या लोकांवर प्रेम करणे सोपे नसते. तरीही प्रभू येशू म्हणाला की आपण आपल्या शत्रूंवरही प्रेम केले पाहिजे (पहा मत्तय ५:४४). हे केवळ शक्य आहे कारण देव रहस्यमयपणे आपल्या अंतःकरणात परिवर्तन करतो आणि आपल्याला अलौकिक प्रेम आणि चांगुलपणा देतो. देवावर प्रेम आणि इतरांबद्दल प्रेम हेच आपण प्रभु येशूचे विश्वासू सेवक आहोत याचा पुरावा आहे.

देवाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवन!

पहिल्या दोन सेवकांप्रमाणेच, देवाच्या खऱ्या अनुयायांनी धीरधरणारे आणि विश्वासू असले पाहिजे. जेव्हा आपला धनी येशू परत येनार, तेव्हा आपल्या निष्ठा आणि विश्वासूपणाचे पारितोषिक म्हणजे देवाच्या राज्यात सर्वकाळासाठी प्रवेश करणे. ते राज्य “जे देवाच्या आज्ञा पाळतात व येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी” आहे (प्रकटीकरण १४:१२).

जर तुम्हाला देवाच्या राज्यात सदासर्वकाळ जगणाऱ्यांमध्ये सामील व्हायचे असेल, तर तुम्ही अशी प्रार्थना करू शकता:

प्रिय देवा, मला तुझ्या राज्यात तुझ्याबरोबर राहायचे आहे. मला शिकव आणि तू परत येईपर्यंत मला विश्वासू राहण्यास मदत कर. मला एका चांगल्या ठिकाणी नेण्याच्या तुमच्या वचनाबद्दल धन्यवाद! आमेन.

तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया या पेपरच्या मागच्या बाजूच्या माहितीवर आमच्याशी संपर्क साधा.

Copyright © 2023 by Sharing Hope Publications. लेखी परवानगीशिवाय गैर-व्यवसायिक हेतूंसाठी मुद्रण प्रसार करण्याची परवानगी आहे.
मराठी सुधारीत आवृत्ती पुन्हा संपादित बायबल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे पवित्र शास्त्र कॉपीराइट © २०१५. 

आमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा

नवीन प्रकाशने केव्हा उपलब्ध होतील हे जाणून घेणारे पहिले व्हा!

newsletter-cover